Latur crime : चाकुरात किराणा दुकान, बार फोडून ६२ हजारांचा माल लंपास

व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

चाकूर : चाकूर शहरात एका रात्रीत किराणा दुकान, बार आणि ज्वेलर्सला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यामध्ये किराणा दुकान व बारमधून एकूण ६२ हजार ७८० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर ज्वेलर्सचे कुलूप तोडूनही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या सलग घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मज्जीद चौकातील गोविंदराज किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील गोडतेलाचे सहा डबे, तांदळाचे चार कट्टे आणि साबुदाण्याचा एक कट्टा असा २४ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेण्यात आला. शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेले मालक गोविंद रमेश धोंडगे यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.याच रात्री बोथी रोडवरील कॅप्टन बार अँड रेस्टॉरंटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

Crime News
Beed Crime : गुप्तधनाचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक

प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या ६३ बाटल्या आणि गल्ल्यातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड असा ३७ हजार ९८० रुपयांचा ऐवज चोरून नेला.दरम्यान, नगरपंचायत कार्यालयाजवळील स्नेहा ज्वेलर्सचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तेथून कोणताही ऐवज चोरीस गेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Dhamna Dam : शेलूदच्या धामणा धरणात पाणीसाठा वाढला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news