Beed Crime : गुप्तधनाचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक

केज तालुक्यातील प्रकार; गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

केज : घरातील गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने एकाची तीन लाख रुपये उकळले मात्र आणखी पैशाची मागणी केल्याने हा प्रकार मुलांना समजताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी रात्रभर त्या गुप्तधन काढून देण्याचे अमिष दाखविणारा महाराज आणि एका औषध विक्रेत्याला अटक केली आहे. तसेच त्यांच्या कडून दोन लाख रुपये देखील जप्त केले आहेत.

15 जुलै रोजी केज तालुक्यातील बेलगांव येथील सिताराम आश्रुबा घुले यांना त्यांच्या गावात जडी-बुटीचे औषध विक्री करण्यासाठी आलेल्या एका अमरावती जिल्ह्यातील कान्हा रतनसिंग चव्हाण, (रा. सावरखेड, ता. मोरची) याने त्याच्या घरातील गुप्तधन काढून देण्यासाठी वनस्पती विकत आणण्यासाठी त्याच्याकडून 3 लाख 3 हजार 500 रुपये घेतले, परंतु त्यासाठी आणखी वनस्पती लागेल आणि त्यासाठी आणखी 3 लाख 45 हजार रुपयांची औषधी वनस्पती आवश्यक आहे. असे सांगितले.

Crime News
Jalna Crime : अपहरण करून लुटणाऱ्या अट्टल टोळीला पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

यासाठी सिताराम याने त्याच्याकडे एवढी रक्कम नसल्याने त्याने त्यांच्या मुलाकडे पैशाची मागणी केली. मात्र एवढे पैसे कशाला हवे ? अशी मुलांनी वडिलांना माहिती विचारली असता त्यांना यांच्या आईने सांगितले की, घरातील गुप्तधन काढण्यासाठी पैसे हवे आहेत.

हा प्रकार मुलांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून घडलेली माहिती केज पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना कथन केली. फिर्याद दाखल होताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि पोलिस नाईक तरकसे यांनी अवघ्या 24 तासात तो गुप्तधन काढून देण्याचे अमिष दाखविणारा भामटा कान्हा चव्हाण याला मसाजोग येथून तर त्याने सांगितलेली महागडी औषधी विक्री करणारा अमोल दिगंबर गिरी याला बीड येथून ताब्यात घेतले आहे.

Crime News
Dhamna Dam : शेलूदच्या धामणा धरणात पाणीसाठा वाढला

घरात खोदला खड्डा

घरातील गुप्तधन काढून देतो म्हणून भोंदू महाराज कान्हा चव्हाण याने सिताराम घुले याला घरात खड्डा खोदायला सांगितले आणि रात्री पूजा करून घरातील सर्व लाईट बंद करून त्या खड्ड्या‌तून एक तांब्याची कळशी, प्लेट काढून ते एका पांढऱ्या कपड्यात बांधून कोणालाही न सांगता सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते. कान्हा चव्हाण हा जडीबुटी औषध विक्री करीत असून त्याने बेलगाव येथे औषध विक्रीचे रस्त्यावर पाल ठोकले होते.

त्या ठिकाणी मणके दुखीचे औषधोपवर करून घेण्यासाठी सिताराम घुले गेले. त्याचे जडीबुटीचे औषध घेतल्याने त्यांना थोडे बरे वाटले. त्या नंतर ते त्या दुकाना समोरून मंदिरात दर्शन घ्यायला जात असल्याने त्या दोघांची ओळख झाली आणि त्यातून सिताराम यांनी एके दिवशी कान्हा याला चहा पिण्यासाठी घरी घेऊन गेल्या नंतर त्याने तुमच्या घरात गुप्त धनाचे हांडे आहेत. असे आमिष दाखवून ते गुप्तधन काढण्यासाठी औषधी वनस्पतीची गरज असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news