Dhamna Dam : शेलूदच्या धामणा धरणात पाणीसाठा वाढला

दोन दिवसात ११ टक्क्यांची वाढ, १२ गावांतील ग्रामस्थांना दिलासा
Dhamna Dam water level
पिंपळगाव रेणुकाई : शेलूद येथील धामणा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. (छाया : संदीप देशमुख )
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दोन दिवसात ११ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाची पाणीपातळी १५ टक्क्यापर्यत पोहचली आहे.

भोकरदन तालुक्यातील महत्त्वा‍चे पाणी साठवणारे स्त्रोत धामणा धरण आहे. या धरणातून शेलूसह परिसरातील १२ गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने जून अखेरपर्यंत धरणात केवळ ४ टक्केच पाणी शिल्लक होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

Dhamna Dam water level
Chhatrapati Sambhajinagar rain : मुसळधार पावसाने खेळणा धरण ३० टक्क्यांवर

गेल्या ४८ तासात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला विसर्ग झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा एकदम ११ टक्क्यांनी वाढून तो १५ टक्क्यांवर गेला आहे.

जून-जुलै महिना संपूनही केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या या धरणातील साठा आता १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या १२ गावातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dhamna Dam water level
Chhatrapati Sambhajinagar News : धोंदलगावच्या आदिवासी वस्ती शाळेचा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांची पायपीट

शेतकऱ्यांना दिलासा, पण चिंता कायम

पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी अद्याप धरण पूर्णपणे भरले नाही. १५ टक्के साठा म्हणजे फारसा समाधानकारक नाही. येत्या काळात अजून पाऊस न झाल्यास पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news