Latur News : चाकूर-लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉट

आठ दिवसांत चार जणांचा मृत्यू; उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
Latur News
Latur News : चाकूर-लातूररोड बायपास ठरतोय अपघाताचा 'ब्लॅक स्पॉटfile photo
Published on
Updated on

Chakur-Latur Road bypass emerging as an accident 'black spot'.

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चाकूर आणि लातूररोड बायपास, टी पॉइंटवर दिवसेंदिवस अपघात वाढले असून त्या अपघातात आठ दिवसांत चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याने ते ठिकाण अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरतोय.

Latur News
Hormuz Strait | ‘नाकेबंदी’ची मीमांसा

राष्ट्रीय महामार्गावर चाकूर बायपास आणि लातूर रोड बायपास टी-पॉइंटवर दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच असून चाकूर बायपासवर शनिवारी पुन्हा एकदा तिहेरी भीषण अपघात झाला आहे.

त्या अपघातात अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १०२०) भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून (अलगरवाडी पाटी) बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्दन काळबा येणगे वय ६० वर्षे व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येणगे वय ५५ रा. तेलगाव हे पती पत्नी जागीच ठार झाले. या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर एम एच २४ बी आर ७१२१ कारवर जोरदार धडकले.

वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे वय १६वर्षे रा. शिरूर ताजबंद या तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने या धोकादायक ठिकाणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठ दिवसापूर्वी वडवळ जवळील शंकरनगर तांडा येथील माजी उपसरपंच पंडित नामदेव पवार वय ५७ मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना लातूर रोड बायपास टी पॉइंटजवळ त्यांच्या मोटारसायकलला उड्डाणपुलावरून येणाऱ्या भरधाव ऑटोने त्यांना जोरदार धडक दिली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Latur News
Indian Economy | रिझर्व्ह बँकेची कसोटी

लातूरहून नांदेडकडे गेलेला राष्ट्रीय महामार्ग अतिशय भयावह ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दीड ते दोन किलोमिटर अंतराच्या उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. ती अपेक्षित असलेली ठिकाणे सोडून दुसरीकडेच केल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. चाकूर आणि लातूर रोड बायपास, टी पॉइंटवर दुचाकीवरून जाणारे नागरिक रस्ता ओलांडून जाताना पूर्णपणे गोंधळून जातात. यामुळे तेथे अपघात होत आहेत.

चाकूर आणि लातूर रोडचा उड्डाणपूल जवळपास एक ते सव्वा किलोमीटरचा उभारण्यात आलेला आहे. चाकूरला बायपास अलगरवाडी पाटीजवळ उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. परंतु तेथे उड्डाणपूल न झाल्यामुळे त्या बायपास टी पॉइंटवर राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तो रस्ता अतिशय धोकादायक ठरत आहे. तेथून रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. कारण नांदेडहून येणाऱ्या वाहनाचा वेग उतारामुळे भरधाव असतो.

त्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्यामु याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने अपघात होऊन या दृष्टीने कुठलीच नियमावली नागरिकांच हितासाठी वापरली नसल्यामुळे या ठिकाण वारंवार अपघात घडत आहेत. पुरेशा सुर उपाययोजनांचा अभाव, वेग नियंत्रणासा प्रभावी यंत्रणा नसणे आणि या रस्त्याकडे दुल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त्त है आहे. स्थानिकांनी चाकूर बायपास व लातूररोड पॉइंटवर उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्या ठोस कार्यवाही झाली पाहिजे. परिणामी ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच राहण आहे. दरम्यान रविवारी सकाळी ८ च्या सुमार त्या अपघात स्थळापासून काही अंतरावरच दे चारचाकी वाहनांचा अपघात झाला असून त अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

तालुक्यातील नांदगावनंतर चाकूर-लातूर रोड बायपास टी पॉइंट हा मोठा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून दिव-सेंदिवस ओळखला जात आहे. भविष्यात याठिकाणचे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news