Tiranga Rally : औसा शहरात भाजपाच्या तिरंगा रॅलीने लक्ष वेधले

आमदार अभिमन्यू पवार यांचा सहभाग, रॅली उत्साहात
Tiranga Rally
Tiranga Rally : औसा शहरात भाजपाच्या तिरंगा रॅलीने लक्ष वेधलेfile photo
Published on
Updated on

BJP's Tiranga Rally draws attention in Ausa city

लातूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत 'तिरंगा रॅली' अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून औसा शहरात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत पायी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Tiranga Rally
Latur railway project : ‘निलंगा की औसा?’ रेल्वे मार्गावरून नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

औसा शहरातील हनुमान मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले. हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत नंदी मठ येथे पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणांसह हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचे दर्शन घडविले. आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tiranga Rally
Latur crime: अजनसोंड्यात चौकशीदरम्यान जातीवाचक शिवीगाळ; एकमेकांविरोधात अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल

भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्सव प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरावा, तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news