

Be Prepared for the Kharif Season in Light of El Niño: Guardian Minister
लातूर, पुढारी वृतसेवा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या २०२६ च्या मान्-सूनवर एल-निनोचा प्रतिकूल अंदाजानुसार परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यकसज्जता ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खत वापर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्रतोद आ. विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आ. रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, अग्रणी बँक, आत्मा, वन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते यांचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषि निविष्ठा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत. कोणत्याही तालुक्यात तुटवडा निर्माण होवू नये, यासाठी निविष्ठा वितरणात सुसूत्रता ठेवावी, महाबीज बियाणे वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
'एल-निनो 'मुळे मॉन्सूनमध्ये अनिश्चितता राहणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणी योग्य कालावधीबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे, कोणत्या कालावधीत कोणत्या पिकाची पेरणी करणे योग्य राहील, याबाबत जनजागृती करावी. तसेच संभाव्य परिस्थितीत दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध होईल, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी खरी हंगाम पूर्वतयारीबाबत माहिती दिली आगामी खरीप हंगामात ४ लाख ८८ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर खरी पेरणीचे नियोजन असून त्यासाठी लाख ६४ हजार २४८ क्विंटल बियाण लागणार आहे. यापैकी २ लाख ३० हजार ७६१ क्विंटल बियाण शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांचे एकूण १ लाख २० हजार ४८७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.
रासायनिक खतांच्या सरासरी वापरानुसार यंदा १ लाख ४५ हजा मेट्रिक टन खताची आवश्यकत भासेल असा अंदाज आहे. त्यानुसा महिनानिहाय पुरेसे खतसाठाउपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. आमदा काळे, खासदार डॉ. काळगे, आमदा कराड यांनीही यावेळी अनुषंगिक सूचना दिल्या.