Jalna News : १३०३ कोटींचे उद्दिष्ट; वाटप ४९ कोटी !

खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठक; त्वरित पीक कर्ज वितरित करून उद्दिष्ट पूर्ण करा : पालकमंत्री पंकजा मुंडे
Jalna News
Jalna News : १३०३ कोटींचे उद्दिष्ट; वाटप ४९ कोटी !file photo
Published on
Updated on

Jalna News: Target of ₹1,303 Crore; Disbursement: ₹49 Crore!

जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वितरण करून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिले.

Jalna News
Chhatrapati Sambhajinagar News | शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही : आ. भुमरे

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन २०२६-२७ बैठक पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढ़ाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे जिल्हास्तरीय स्वरीप हंगामपुर्व आढावा बैठक-२०२६ यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, काही दिवसांत मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाचे कामे सुरू होणार आहेत. तसेच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्याला १ लाख ६ हजार शेतकऱ्यांना १३०३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर फक्त ४९ कोटी रुपयांचेच पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या कर्ज प्रकरणांना त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.

Jalna News
Agriculture Insurance Company | अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त: तांत्रिक अंदाजांवर तोकडी भरपाई

खरीप हंगामासाठी २ लाख २ हजार मेट्रिक टन खताचा वापर होतो. खरीप हंगामासाठी २ लाख ४३ हजार ५०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या १ लाख २४ हजार ९३२ मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकयांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

६ लाख ४७ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन जिल्ह्यात ६ लाख ४७ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ३३ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी १ लाख ६२ हजार १६२ क्लिंटल बियाण्याची आवश्यकता असून खुल्या बाजारात जवळपास ६० हजार क्विंटल बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व इतर खाजगी कंपन्या यांच्याकडून उपलब्ध होईल.

उर्वरित १ लाख किंटल बियाणे शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसेच कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून ४५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे.

त्यासाठी ११ लाख २ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता असून दरवर्षी प्रमाणे चालू हंगामासाठी १३ लाखांपेक्षा जास्त कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिली.

४३७ कोटी ३९ लाख रुपयांची भरपाई

अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे जिल्ह्यात ४ लाख ६४ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ६ लाख २६ हजार ९२६ शेतकऱ्यांना एकूण ४३७ कोटी ३९ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news