Ahmedpur Banana : अहमदपूरची केळी थेट इराणच्या बाजारात

रेड्डी यांचा केळीच्या बागेची सर्वत्र चर्चा, सेंद्रिय फळे, पहिल्या तोडीला विक्रमी उत्पादन
Bananas from Ahmedpur directly to Iranian market
अहमदपूरची केळी थेट इराणच्या बाजारात File Photo
Published on
Updated on

Bananas from Ahmedpur directly to Iranian market

नरसिंग सांगवीकर

अहमदपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी यांच्या शेतातील सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली केळी सातासमुद्रापार गेली असून इराकच्या बाजारात या केळीला दुप्पट भाव मिळाला आहे. रेड्डी यांनी आपल्या अहमदपूर येथील उच्च प्रतीच्या केळीची १६ डिसेंबर २०२५ रोजी ५५ अंतरावर ३००० रोपांची लागवड केली होती.

Bananas from Ahmedpur directly to Iranian market
Farmer ID : फार्मर आयडी प्रमाणित न झाल्याने शेतकऱ्यांत संताप

सुरूवातीपासून रासायनिक खतांना फाटा देत गाईचे शेणखत, गोमूत्र फवारणी, ठिबक सिंचनाद्वारे पाणी, गोमूत्र व जीवामृताचा वापर आदी नियोजनबद्ध बाबींमुळे पिकांची जोमदार वाढ होऊ शकली. आंतरमशागत व नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे बागेत कुठलाच रोग पडला नाही शिवाय योग्य पोषण झाल्याने झाड मोडून पडले नाही. परिणामी केळी पिकाची एकसमान वाढ झाली. लागवडीपासून अवघ्या सात महिन्यात केळीला वादी आली आणि दहा महिन्यांत केळी विक्रीसाठी तयार झाली.

कृषी सहायक अधिकारी विष्णू कलमे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारात ८ ते ९ रुपये प्रति किलो दर मिळत असताना निर्यात झाल्यामुळे त्यांना १७ ते १८ रुपये प्रति किलो इतका दुप्पट दर मिळाला आहे. केळी लागवडीपासून काढणीपर्यंत १,५०,००० रुपये खर्च आला असून, अपेक्षित ९० टन उत्पादनातून १७,००० रुपये प्रति टन दराने त्यांना १५,३०,००० रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

Bananas from Ahmedpur directly to Iranian market
Leopard News : अकोलादेव, काळेगावात बिबट्या दिसल्याने भीती

या उपर अहमदपूरची केळी सातासमुद्रापार इराकला पोहोचली हा आनंद वेगळाच. केळीची पहिली तोड करून वाहनात भरून केळी रवाना झाली असून या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी शेतात जाऊन बागेची पाहणी केली. यावेळी तलाठी अविनाश पवार, भारत सांगवीकर माधव कासले, अनिकेत फुलारी, आयुब, शिवा कासले, शिवकुमार बेद्रे, शिवा भारती, अजित सांगवीकर, बबन फुलमंटे, ऋषी हालसे मारुती मरेवाड रंगनाथ गिरी, वसंत पवार, गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news