Latur Rain : दहा एकरवरील केळीबागा भुईसपाट

वादळी वाऱ्यासह अवकाळीचा नदीवाडी हंचणाळ शिवारात कहर
Latur Rain
Latur Rain : दहा एकरवरील केळीबागा भुईसपाटfile photo
Published on
Updated on

Banana plantations spread over ten acres flattened

निलंगा, पूढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नदवाडी हंचनाळ परिसरातील शेतकऱ्यांवर शनिवारी (दि.६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे संकट को-सळले आहे. अवघ्या काही मिनिटांच्या तुफानी वादळाने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फेरले. नदीवाडी शिवारातील सुमारे १० एकरांवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. तर अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंपावरील सोलर पॅनल संचांचेही मोठे नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

Latur Rain
Purna Stromy Rain | एरंडेश्वर शेतशिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा हाहाकार; २५ एकर केळीबाग भुईसपाट

शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घालला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घडांना आ लेली केळीची झाडे उन्मळून पडली. काढणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले.

Latur Rain
Unseasonal rainfall impact Jalna : रब्बी पिकांसह खरबूज, टरबुजांचे मोठे नुकसान

प्राथमिक माहितीनुसार नदीवाडी येथील शेतकरी तुकाराम बैनगिरे व हणमंत बैनगिरे यांच्या गट क्र. १६० मधील सुमारे १० एकरवरील केळीबाग पूर्ण उद्ध्वस्त झाली. सोमनाथ लक्ष्मण पाटील सर्वे नो. १५१यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news