Purna Stromy Rain | एरंडेश्वर शेतशिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा हाहाकार; २५ एकर केळीबाग भुईसपाट

झाडं मोडून पडल्याने माटेगाव -कात्नेश्वर रस्ता झाला ब्लॉक , वाहतूक ठप्प, सोलर पॅनेल उडून गेले
Purna Stromy Rain | एरंडेश्वर शेतशिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा हाहाकार; २५ एकर केळीबाग भुईसपाट
Purna Stromy Rain | एरंडेश्वर शेतशिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळीचा हाहाकार; २५ एकर केळीबाग भुईसपाट
Published on
Updated on

पूर्णा: तालूक्यातील एरंडेश्वर,कात्नेश्वर शेतशिवार परिसरात ता ६ जून रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान अचानक जोरदार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊसाने हाहाकार घातला.अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे एरंडेश्वर शेतशिवारात घडफळाला आलेल्या जवळपास २५ एकर केळीबाग वादळीवारा व पावसाच्या तडाख्यात भुईसपाट झाल्या.

अनेकांच्या विहिरी बोअरवेलचे कृषी पंपाचे सोलर पॅनल संच मोडून पडले.त्यामुळे केळी उत्पादक शेतक-यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.त्या शिवाय वादळीवा-यात लक्ष्मीनगर परिसरात मोठी झाडे मोडून रोडवर आडवी पडली. त्यामुळे माटेगाव ते कात्नेश्वर झिरोफाटा रस्ता ब्लॉक झाला होता.तिथे प्रवाशी आपल्या वाहनासह अडकून पडले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून झाडे कटई मशिन यंत्रणा रवाना करुन बंद झालेल्या रस्त्यातील झाडं फांद्या काढून टाकण्याचे काम सुरू होते.बरेच तास रस्ता वाहतुक ठप्प झाली होती.तुफान सुटलेला वादळी आणि पाऊसात सध्या स्थित एरंडेश्वर येथील शेतकरी गोविंद शिवाजी काळे,लत्ता दिपक काळे गट क्र ४७५ मधील परिपक्व केळीघडांची ३ एकर केळी बाग मोडून भुईसपाट झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत.हे वृत्त लिहीपर्यंत सदर शेतकऱ्यांची नावे कळू शकली नाही.अचानक उद्भवलेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळीबागा, मोडून पडलेले सोलर पॅनल संचाचे पंचनामे करून अनूदान देण्याची मागणी करण्यात येत आहे.

अनेकांचे कृषीपंप सोलर पॅनल पडले मोडून

दरम्यान,या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊसात एरंडेश्वर येथील अनेक शेतकऱ्यांच्या विहिर बोअरवेल वर बसवलेल्या कृषी पंपाचे सोलर पॅनल मोडून पडले.त्यात सध्या घडीला गजानन काळे यांचे सोलार पॅनल मोडून पडल्याचे नाव समोर आले असून अजून ब-याच शेतकऱ्यांचे सोलारचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान,या अवकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा हाहाकार सुरू होताच शेतकरी नागरीकात एकच पळापळ व धांदल उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news