Nilanga Robbery | निलंगा तालुक्यात क्लबवर सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला: कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून रोकड लुटली

निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवर तांबाळा परिसरात थरार : पोलिसांनी एकाला केले जेरबंद
Robbery at Tambala Nilanga
Robbery at Tambala NilangaPudhari
Published on
Updated on

Robbery at Tambala Nilanga

निलंगा : तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या तांबाळा येथील एका मोठ्या नामांकित क्लबवर सोमवारी (दि.३०) रात्री ११ च्या सुमारास चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला. या टोळीने क्लबमध्ये धुमाकूळ घालत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोकड लुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कासार शिरशी पोलिसांनी तत्परता दाखवत एका आरोपीला जागेवर जेरबंद केले असून,इतर चार साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तांबाळा येथील क्लबमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील व्यापारी, उद्योगपतींची मोठी वर्दळ असते. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. सोमवारी रात्री एक 'इनोव्हा' गाडी क्लबसमोर येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या टोळीने थेट आत प्रवेश करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्लबमध्ये मोठी खळबळ उडाली. दरोडेखोरांनी जेवढी रक्कम हाती लागेल, ती घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला.

Robbery at Tambala Nilanga
Latur Crime News : मुलानेच केली आईच्या दागिन्यांची चोरी

विनाक्रमांकाच्या कारचा दरोड्यामध्ये केला वापर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तांबाळा येथे असलेल्या मोठ्या क्लबवर दरोडेखोर विनाक्रमांकाच्या कारमधून दाखल झाले. अचानकपणे क्लबमध्ये घुसून कर्मचाऱ्यांसह इतरांना मारहाण केली. त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच कासार शिरशी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून पाचपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली? याचा आकडा रात्री उशिरापर्यंत समोर आला नाही.

Robbery at Tambala Nilanga
Latur crime news | संशयास्पद ! ज्ञानेश्वर वाकडे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

एका आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू आहे. घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली? पसार झालेले आरोपी कोण होते? याचाही तपास सुरू आहे. पकडलेल्या आरोपीचा जबाब नोंदवून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. पसार झालेल्या आरोपीच्या मागावर पोलिस आहे.

- प्रवीण राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कासार शिरशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news