Latur crime news | संशयास्पद ! ज्ञानेश्वर वाकडे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

अपघात की घातपात ;गंभीर जखमी झाले होते
Death
DeathPudhari
Published on
Updated on

निलंगा: भारतीय जनता पक्षातून बंडखोरी केलेले ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कारला १४ फेब्रुवारी शनिवारी पहाटे मोहोळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात वाकडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या दहा दिवसापासून ते दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होते. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

निलंगा पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे हे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यासाठी मुंबईला गेले होते. ही तक्रार दाखल करून ते आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा गावाकडे परतत होते. तेव्हा पहाटेच्या सुमारास मोहोळजवळील हायवेवर असताना, त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता.तो अपघात की घातपात अशी चर्चा आज दिवसभर परिसरात होत होती.

या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गाडीतील इतर तीन ते चार जण जखमी झाले होते, ज्ञानेश्वर वाकडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती सोलापूर उपचार सुरू होते. परंतु तब्बल दहा दिवसानंतर वाकडे यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news