Latur Crime News : मुलानेच केली आईच्या दागिन्यांची चोरी

नऊ तोळे सोने लंपास; तीन तासांत घरफोडी उघड
Latur Crime News
Latur Crime News : मुलानेच केली आईच्या दागिन्यांची चोरीPudhari Photo
Published on
Updated on

Son stole mother's jewelry

लातूर, पुढारी वृत्तसेवा: लातूर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीस गेलेला ९ तोळे सोन्याचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादीचाच मुलगा असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Latur Crime News
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : पालकमंत्री

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाडगाव (ता. जि. लातूर) येथील सुनिता दगडू भामरे (वय ५०) यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केले होते.

चोरीस गेलेल्या ऐवजात एक गंठन, सहा अंगठ्या, एक बोरमाळ, सरपाळे व दोन झुमके असा एकूण ९ तोळे सोन्याचा समावेश होता. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

Latur Crime News
Latur Crime : बारावी परीक्षा केंद्रावरील महिला मदतनीसाचा विनयभंग; संस्थाध्यक्षाला पोलिसांनी लॉजवरून ठोकल्या बेड्या

पोलिसांनी प्रशांत दगडू भामरे (वय ३०) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा फिर्यादीचा मुलगा असून घरातील परिस्थितीची पूर्ण माहिती असल्याने त्याने सहजपणे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने चोरी केलेले दागिने स्वतःच्या घरातील कपाटात लपवून ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत आरोपीला अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news