

अहमदपूर : तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट असून याची मतदार संख्या एक लाख 60 हजार 693 एवढी आहे. या तालुक्यांमध्ये एकूण बारा गण आहेत. या तालुक्यात एकूण 200 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे व सहायक तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी दिली.
खंडाळी गट हा नामाप्र महिलांसाठी आरक्षित असून13629 मतदार आहेत. दोन गण आहेत. खंडाळी गण नामाप्र महिला साठी असून एकूण 13436 मतदार आहेत. उजना गन हा (नामाप्र) महिला साठी आरक्षित असून येथे एकूण 19 मतदान केंद्र आहेत. खंडाळी गटामध्ये 27 हजार 65 मतदार आहेत.हाडोळती गट हा सर्वसाधारण साठी आरक्षित असून गटाची एकूण मतदार संख्या 27404 आहे. यातील हाडोळती हा गण सर्वसाधारण महिला साठी आरक्षित आहे.
येथे 16 मतदान केंद्र आहेत. 13827 मतदार असून कुमठा बु. गण हा सर्वसाधारण साठी आरक्षित आहे. यामध्ये 13577 मतदार आहेत.शिरूर ताजबंद गट अनुसूचित जातीसाठी आहे येथे 28 हजार 474 मतदार आहेत. यातील शिरूर ताजबंद गण सर्वसाधारणसाठी आरक्षित असून 13532 मतदार आहेत. वळसंगी गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून 14942 मतदार आहेत. अंधोरी गट सर्वसाधारणसाठी आरक्षित असून 24835 मतदार संख्या आहे.यामध्ये अंधोरी हा गण सर्वसाधारण साठी असून 12404 मतदार आहेत. थोडगा गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. 12431 मतदार आहेत.
किनगाव हा गट नामाप्र साठी आरक्षित आहे मतदार संख्या 25 हजार 672 ए आहे. यामध्ये किनगाव गन हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असून एकूण 13845 मतदार आहेत. धानोरा गण नामाप्रसाठी आरक्षित असून एकूण 11837 मतदार आहेत.सावरगाव रोकडा हा गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. याची मतदार संख्या 27 243 आहे. यामध्ये सावरगाव रोकडा हा गण सर्वसाधारण साठी आरक्षित असून एकूण 13569 मतदार आहेत. काजळ हिप्परगा गन हा अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित असून एकूण 13569 मतदार आहेत.
अहमदपूर तालुक्यात एकूण200 मतदान केंद्र असून पुरुष मतदार 83 हजार 946 एवढे आहेत तर स्त्री मतदारसंघ 76 हजार 747 असे एकूण एक लाख 60 हजार 693 एवढे मतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे व निवडणूक सहायक तहसीलदार उज्ज्वला पांगरकर आणि तलाठी अविनाश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.