Latur News : मुझे जरुरत तेरे जैसे यार की..

आ. अमित देशमुख व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यांत दिलखुलास संवाद
Amit Deshmukh Sambhaji Patil Nilangekar
आ. अमित देशमुख व आ. संभाजी पाटील निलंगेकर दिलखुलासपणे गप्पा मारताना.pudhari photo
Published on
Updated on

लातूर : शहाजी पवार

राजकारणात काय घडेल? कुठे जमेल? कुठे बिघडेल? हे निश्चितपणे सांगता येत नाही. एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेणारे राजकारणी एकमेकांचे कट्टर विरोधक असतात हा सर्वसाधारण समज. त्याला काही सभा बैठकांतील भाषण - वक्तव्याचा टेकू मिळाला की नागरिकांसह कार्यकर्त्यांनाही हा समज सत्य वाटू लागतो. मग जो तो आपला पक्ष आपला नेता कसा बरोबर आहे याचेच दावे करीत बसतो. मात्र एकमेकांचे शत्रू वाटणाऱ्या नेत्यांचा जेंव्हा सच्चे मित्र असल्यागत संवाद होतो त्यावेळी मात्र भूवया आपोआप वर जातात, याचाच दाखला हजारो लातुरकरांनी लातुरात एका लग्नसोहळ्यातून अनुभवला.

औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे व्याही तथा लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी यांचा विवाह लातूर येथे रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यास अनेक मंत्री , लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. मात्र त्यात लक्षवेधी ठरले ते लातूर शहरचे आमदार अमित देशमुख व निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर.

Amit Deshmukh Sambhaji Patil Nilangekar
Satara politics: भाजप-राष्ट्रवादीतच खणाखणी

देशमुख व निलंगेकरांची एकमेका नजीक सोफ्यावर बैठक होती. लग्न आटोपले त्यानंतर आ. अमित देशमुख व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यांत दिलखुलास संवाद रंगला. एकमेकांनी हस्तांदोलन केले. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद व देहबोली वाचणाऱ्यासारखी होती. ते पहाता हे दोघेही एकमेकांचे जीवश्य कंठश्य मित्र आहेत असेच भासत होते.

दरम्यान अमित देशमुख फॅन्स या फेसबुकवर पेजवर सोमवारी सकाळी हा गाठी भेटीचा व्हिडिओ झळकला अन्‌‍ अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरे तर देशमुख निलंगेकर यांचे पक्ष वेगळे. विशेष म्हणजे निवडणुकांत निलंगेकरांनी अमित देशमुखांवर टोकाची टिका केली.

लग्नसोहळ्यातील हा स्नेहसंकुल संवाद पाहून निलंगेकर देशमुख यांच राजकारणात साटलोट आहे. पक्षापेक्षाही एकमेकांना सोयीचे होईल असे राजकराण ते करतात. भांडत बसतात ते कार्यकर्ते. बऱ्याचजणांनी तर या संवादाचे स्वागतही केले. त्यास सुसंस्कृत राजकारणही संबोधले. समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस धो धो बरसू लागला. अनेकांनी ती चित्रफित ‌‘ थानेदार‌’ चित्रपटातील इंदीवर यांनी लिहेलेल्या व भप्पीने गायलेल्या ‌‘मुझे जरुरत मेरे जैसे यार की‌’ या गीतासह शेअर केली.

Amit Deshmukh Sambhaji Patil Nilangekar
Chandrashekhar Bawankule statement: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी सत्तेत वाटा नाही; महापालिकांवर महायुतीचीच सत्ता
  • लग्नसोहळ्यातील हा स्नेहसंकुल संवाद पाहून निलंगेकर देशमुख यांच राजकारणात साटलोट आहे. पक्षापेक्षाही एकमेकांना सोयीचे होईल असे राजकराण ते करतात. भांडत बसतात ते कार्यकर्ते. नेहमीप्रमाणे या चर्चा जिल्हाभर झडू लागल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news