

A ten feet long, 100 kg crocodile was caught
किनगाव, पुढारी वृत्तसेवा :
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात दहा फुटाची मगर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. शुक्रवारी रात्री ही मगर पकडण्यात यश आले.
मगरीची माहिती शुक्रवारी वन विभागाला मिळताच शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. ही मगर विष्णूकांता मुरलीधर केंद्रे (६०) रा. केंद्रेवाडी या शेतकऱ्याला म्हैस चारताना महादेव मंदिराजवळील कालव्या जवळ दिसून आली तेंव्हा त्यांनी गावातील नागरिकांना सांगितले.
त्यानंतर वनविभागाला कळविले त्यानंतर अहमदपूर व उदगीर येथील टीम मगर शोधण्यासाठी दाखल झाली होती. दहा फूट लांब वजन १०० किलो वजनाची मगर पकडण्यात आली आहे. ही मगर पकडण्यात आली असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.