Vadawal Gram Panchayat Protest
तालुक्यातील वडवळ ना. येथील सटवाई नगर भागात साचलेल्या पाण्यासाठी ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी सकाळी कुलूप लावले.Pudhari Photo

Vadawal Gram Panchayat Protest | संतप्त नागरिकांनी वडवळ ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

तालुक्यातील वडवळ ना. येथील सटवाई नगर भागात साचलेल्या पाण्यासाठी ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी सकाळी कुलूप लावले.
Published on

चाकूर : तालुक्यातील वडवळ ना.येथील सटवाई नगर भागात साचलेल्या पाण्यासाठी ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी सकाळी कुलूप लावले.

वडवळ येथील ग्रामस्थांनी गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना निवेदन देवून सटवाईनगरचे पाणी काढून द्या, अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. परंतु या मागणीवर कसलीच कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या समस्या संदर्भात यापूर्वी नागरिकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही तात्पुरते काम केले होते. आज परत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी थांबले आहे. पहिलेच पाणी निघाले नसल्याने परत पावसाचे पाणी थांबले आहे. यामुळे सटवाईनगर भागातील नागरिकांनी अखेर संतप्त होवून आज तीव्र आंदोलन करून सटवाईनगर भागातील साचलेल्या पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी अशी मागणी केली.

Vadawal Gram Panchayat Protest
Latur Rain : चाकूर तालुक्यातील रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

यावेळी विद्यमान उपसरपंच बालाजी गंदगे, राजकुमार बेंडके,उमाकांत सुवर्णकार,बाबू भेटे,आशिष चौधरी,काशिनाथ मिरकिले,माजी सरपंच भगवान लोखंडे आदिसह वडवळ येथील सटवाई भागातील नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news