

A plan to steal money sent by a friend was foiled,
लातूर, पुढारी वृतसेवा मित्राने पाठवलेली पैशाची बॅग चोरीला गेल्याचा बनाव करून त्यातील पैसे हडपण्याचा डाव पोलिस पथकाच्या सतर्कतेने उघडा पडला. अल्ताफ अमीन बडगिरे, (वय ३०) रा. बलसुर जि. धाराशिव, रत्नदीप सुभाष कांबळे, (वय ३०), रा. मीननगर, उमरगा जि. धाराशिव, विजय गायकवाड, रा. लातूर (फरार), सुरज कदम, रा.लातूर (फरार) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ०९ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ११ सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे यांने त्याची पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन गेल्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे, याला दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले.
त्याची विचार-पूस केली असता तो व सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांनी गुन्ह्यातील फिर्यादी रत्नदीप सुभाष कांबळे याला त्याच्या मुंबई येथील मित्राने पाठवलेले पैशाची बॅग चोरली गेल्याची बनाव करून सदरचे पैसे हडपण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी रत्नदीप सुभाष सोनकांबळे, वय २० वर्ष, राहणार मीननगर, उमरगा जिल्हा धाराशिव. यास ताब्यात घेऊन त्याने एका हॉटेलच्या रूममध्ये लपवून ठेवलेली ०९ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे.