Latur Political News : मतदारसंघात रस्त्याचे मोठे जाळे निर्माण करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

केंद्रीय निधीमार्गअंतर्गत ५० कोटी रस्त्यांचे भूमिपूजन
Latur Political News
Latur Political News : मतदारसंघात रस्त्याचे मोठे जाळे निर्माण करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलFile Photo
Published on
Updated on

A large network of roads will be built in the constituency: Minister Babasaheb Patil

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघात रस्त्याचे मोठे जाळे निर्माण करून त्या रस्त्यासाठी भरीव निधी देणार असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सोमवारी शेळगाव व नळेगाव येथे केंद्रीय निधीमार्ग अंतर्गत आयोजित ५० कोटी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उदघाट्क म्हणून ते बोलत होते.

Latur Political News
International Yoga Day : पाच हजार जणांनी केला योगाभ्यास, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमय

शेळगावथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे तर नळेगाव येथे सरपंच सूर्यकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला रमाकांत चवळे, उत्तमराव पाटील, निर्मलाताई वाडकर, पद्माकर पाटील, करीम गुळवे, मिलिंद महालिंगे, गंगाधरप्पा अक्कानवरू, यशवंत जाधव, सुदर्शन मुंडे, बालाजी सूर्यवंशी, राहुल सुरवसे, भानुदास पोटे, मुज्जमिल सय्यद, इलियास सय्यद, मुर्तुजा सय्यद, राम कसबे, गणपत कवठे, विष्णू तिकटे, उपविभागीय अभियंता सुरज गोंड, शिवदर्शन स्वामी आदिजण उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.पाटील यांनी या रस्त्यांमुळे दळणवळ -णाला चालना मिळणार आहे. तसेच रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे मोठे कार्य या माध्यमातून करायचे आहे. राज्यातल्या सोसायटींना भरीव निधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचे आहे. सौर ऊर्जेसाठी शासन भरिव निधी देत असून आपण सर्वांनी सौर ऊर्जा प्रकल्पाकडे वळावे, शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी.

Latur Political News
Latur Crime News | न्यायालयाच्या सुचनांचे पालन केले नसल्याने एकास ३ महिन्याचा तुरुंगवास

चाकूर तालुक्यात भविष्यात दूध प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे सांगितले.

यावेळी भानुदास पोटे, विश्वनाथ एडके, प्रकाश बंडे, गणपतराव मुंडे, सुभाष चापुले, संदीप शेटे, सिद्धेश्वर अंकलकोटे, मधुकर मुंडे, सचिन तोरे, तानाजी शिंदाळकर, चंद्रकांत शेलार, बळवंतराव पाटील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर अधिक्षक अभियंता अल्का डाके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी व बिलाल पठाण यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news