International Yoga Day : पाच हजार जणांनी केला योगाभ्यास, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमय

अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
International Yoga Day
International Yoga Day : पाच हजार जणांनी केला योगाभ्यास, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमयFile Photo
Published on
Updated on

Five thousand people practiced yoga at Latur

लातूर, पुढारी वृतसेवा : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगाभ्यास केला. यावेळी आमदार विक्रम काळे, प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

International Yoga Day
Latur News : रेणापूर तालुक्यात भूजल घटले; भूजल यंत्रणेचा अहवाल

जिल्हा प्रशासन, लातूर शहर महानगरपालिका, पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे-विर ोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, श्रुष्टी जगताप यांच्यासह पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

योग शिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगाभ्यास केला. आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या योगासनांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योग हा आपल्या देशाचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून, निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले.

International Yoga Day
Glanders Infection : लातूर जिल्ह्यातून ६० घोड्यांचे रक्तजल नमुने पाठवले

योगाभ्यास केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असेही त्या म्हणाल्या. दयानंद वाणिज्य महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, केशवराज विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, देशी केंद्र विद्यालय, राजस्थान विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, सदानंद माध्यमिक विद्यालय, आर. एन. मोटेगावकर विद्यालय, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यासह इतर शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रास्ताविक डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news