

उदगीर : न्यायालयाने जामीनदारास वारंवार सूचना देऊनही न्यायालयाच्या सुचनांचे पालन न केल्याप्रकरणी उदगीर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भालचंद्र आर. झेंडे यांनी ४९८ (अ )च्या गुन्ह्यातील जामीनदार मुबारक इस्माईल सय्यद (रा. शेळगाव, ता.चाकूर, जिल्हा लातूर) यास ३ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सय्यद याने त्याच्या मालकीच्या जंगम मालमत्तेची जप्ती आणि विक्री करून रक्कम परत न केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करुन त्याचा अहवाल मागवण्यात आला होता. त्यावरून असे दिसून आले की, मुबारक इस्माईल सय्यद याने त्याच्या नावावर कोणतीही जंगम मालमत्ता ठेवलेली नाही तर ती विक्री केली आहे.
मुळात ती मालमत्ता सय्यदने का विकली? याचे कारण दाखविण्यासाठी न्यायालयात हजर न रहून त्याने हामीदार म्हणून असलेली रक्कम भरण्यासाठी कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे नमुदचा खटला सतत प्रलंबित राहिला तसेच त्याचे उदासीन वर्तन, वेळोवेळी नोटीस बजावून सुद्धा न्यायालयासमोर हजर ठेवण्यास कसुर केल्याने दिवाणी कारावासात सय्यद याला दोषी ठरवले गेले. त्यास ३ महिन्याची शिक्षा व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे.