

रेणापूर : तालुक्यातील सांगवी येथील एका शेतकऱ्यांने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. घटना गुरुवारी (दि ७ ) सायंकाळी ५ .३० च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रेणापूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काकासाहेब वेणूनाथ जाधव (वय ४८ वर्षे रा.सांगवी ता.रेणापूर ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, काकासाहेब जाधव हे काही दिवसांपासून नैराश्येत होते. या नैराश्येतून त्यांनी गुरूवारी सायंकाळी पिंपळफाटा रेणापूर येथील एका हॉटेलच्या मागे असणाऱ्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.