Udgir solar energy project : उदगीर तालुक्यातील 9 हजार 400 घरकुलांवर सौर ऊर्जेची पेटणार मशाल

सरकारकडून ग्रामीण भागावर विशेष लक्ष ; 1 किलोवॅटचे प्रत्येक युनिट
Udgir solar energy project
Udgir solar energy projectpudhari photo
Published on
Updated on

जावेद शेख

उदगीर : ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांच्या आयुष्यात उजेडाची नवी पहाट घेऊन येणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. 2 आणि सन 2024-25 मधील लाभार्थ्यांच्या घरकुलांतर 1 किलोव्हॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

त्यामुळे उदगीर तालुक्यातील 9 हजार 400 घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र राज्य शासनाने यामध्ये आणखी 50 हजार रुपयांची भर टाकत ग्रामीण भागातील घरकुलांना सौरऊर्जेची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे.

Udgir solar energy project
Satara solar energy: राज्यातील 28 लाख घरकुलांवर सौर ऊर्जा प्रणाली

यामध्ये 35 हजार रुपये घरकुलांच्या अतिरिक्त कामांसाठी, तर 15 हजार रुपये सूर्यघरयोजनेंतर्गत सौरऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी खर्च करण्यात येणार आहेत. घरांवर सौरऊर्जाअटी शर्तीची पुर्तता करणे महत्वाचे शासनाने घरकुल योजनेतंर्गत लाभार्थ्यांना घराच्या छतावर 1 किलो वॅटचे प्रत्येक युनिट सौरऊर्जा उभारण्यासाठी घरकुलाच्या अनुदानात वाढ केली आहे. त्यात आज रोजी उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अकराशे घरकुल पूर्ण झाले आहेत.त्यामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार घरकुल लाभार्थ्यांनी सौरऊर्जा पॅनेलची उभारणी केल्यास या जादाच्या अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो.

Udgir solar energy project
Free electricity scheme SMART | 'स्मार्ट’ (SMART) योजनेत गरीबांना २५ वर्ष मोफत वीज

प्रणाली उभारण्याची कार्यपद्धती ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिवांनी निश्चित केली आहे. सौर यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याने पारदर्शकतेवरही भर देण्यात आला आहे.

उदगीर तालुक्यातील 9400 घरकुला पैकी 1100 घरकुलची काम पूर्ण झाले असून त्यातील 59 घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50000 हजारा पैकी 35000 हजार संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे, उर्वरित 15000 सोलार एजन्सीच्या नावे देण्यात येणार आहे, शासनाच्या या सोलार धोरणामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या घरात सूर्यप्रकाश पडणार आहे,

नरेंद्र मेडेवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news