लातूर : बनावट आधार कार्ड विक्री व्यावसायिकावर एटीएसची कारवाई

लातूर : बनावट आधार कार्ड विक्री व्यावसायिकावर एटीएसची कारवाई

लातूर, पुढारी वृतसेवा : बनावट सीमकार्ड विक्री करणाऱ्या उदगीर येथील एका व्यवसाईकावर लातूर शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने कार्यवाही करत त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने एकूण ४८ सिम कार्ड बनावट कागदपत्राचे आधारे ऍक्टिव्हेट करून इतरांना वापरण्यास दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिवकुमार महादेव आंबेसंगे, (वय २७) असे त्याचे नाव आहे. ग्राहकाने दिलेले आधारकार्ड आणि फोटोचा गैरवापर करत एकाच नावाने अनेक सिमकार्ड नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या संशयित आरोपीने २०१७ मध्ये उदगीर नगरपरिषद कॉम्प्लेक्स येथे "व्हीआयपी कम्युनिकेशन" नावाचे दुकान सुरू केले होते. दरम्यान, मोबाईल टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली यातून सदर विक्रेत्यांने ग्राहकांकडून मिळालेला आधारकार्ड आणि फोटोंचा गैरवापर करत एकाच्याच नावे अनेक सिमकार्डची विक्री दाखवत कंपन्यांची फसवणूक केली.

शिवाय बनावट कागदपत्राने ऍक्टिव्हेट केलेले सिमकार्ड अनोळखी व्यक्तींना ज्यादा पैशात विक्री करुन त्याचा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर होऊ शकतो याची जाणीव असताना सुद्धा असे सिमकार्ड विक्री करून कंपनीचे आर्थिक नुकसान व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दहशतवाद विरोधी शाखेचे लातूरचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्याद वरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यात केवळ कंपन्यांच्या फसवणुकीपुरता आहे, की यातून अन्यही काही गैरप्रकार केले गेले आहेत? याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे तपास करीत आहेत.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news