पैठण : नाथसागर धरणात पाण्याची आवक सुरू; १० हजार क्युसेक पाणी जमा होणार

नाथसागर
नाथसागर

पैठण; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील शेती सिंचन औद्योगिक वसाहतीला वरदान ठरलेल्या पैठण येथील नाथसागर धरणामध्ये रविवारी ( दि.१०) रोजी पहाटेपासून वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. तर सायंकाळपर्यंत १० हजार क्युसेक पाण्याची आवक जमा होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे धरण उपअभियंता विजय काकडे यांनी दिली.

नाथसागर धरणाच्या वरील भागातील नाशिक, देवगड, नेवासा, मधमेश्वर बंधार, पालखेड, गंगापूर, करंजवन, ओझरखेड, दारणा, भंडारदरा, कोपरगाव या भागात दोन दिवस झालेल्या पावसामुळे येथील धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. रविवारी रोजी सकाळी ५ हजार ३३ क्युसेक आवक सुरू झाली आहे. सायंकाळपर्यंत वरील भागातून १० हजार क्युसेक पाण्याची आवक जमा होणार असल्याचा अंदाज कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सध्या नाथसागर धरणाची ३२.९७ पाण्याची टक्केवारी आहे.

या धरणाच्या डाव्या- उजव्या दोन्ही कॅनलमधून १२ क्युसेक पाण्याचा विसर्ग शेती सिंचनसाठी सुरू ठेवला आहे. मागील वर्षी याच तारखेला ९८.७९ पाण्याची टक्केवारी होती. दोन दिवस पैठण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असून रविवार रोजी मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकाची मशागत सुरू केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news