हिंगोली : कुंभारवाडी येथील चोरीचा १२ तासांच्या आत छडा

file photo
file photo

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गावातील माणिक पांडुरंग टारपे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली. वारंगा पोलिस मदत केंद्रांअंतर्गत येणाऱ्या कुंभारवाडी येथील माणिक टारपे याच्या घराला कुलूप होते. दुपारी ३ च्या सुमारास गावातील दोन आरोपीने संगनमताने घराचे कुलूप तोडून प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे २१ हजार शंभर रुपये किमतीचे दागिने चोरले.

गावातील शैलेश सदाशिव डाखोरे व केशव सदाशिव बर्गे यांनी दागिने चोरून नेल्याची फिर्याद माणिक टारफे यांनी संशयित म्हणून नाव घेतले. या व्यक्तींवर आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक २५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून संशयित म्हणून दोघांना अटक केले, अशी माहिती जमादार शेख बाबर यांनी दिली. पुढील तपासात आरोपींनी चोरीची कबुली दिली आणि मंगळसूत्र २, २० तोळे चांदीचे दंडकडे, बांगडी २ , जोडवे २ असा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला, अशी माहिती वारंगा मदत केंद्राचे बीट जमादार, शेख बाबर यांनी दिली. विशेष म्हणजे बारा तासांच्या आत चोरीचा छडा लावला गेलाय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news