Solar Power Project : कुकडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

अडीच महिन्यांपासून काम होते रखडलेले
Solar Power Project
Solar Power Project : कुकडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावरfile photo
Published on
Updated on

Work on solar power project at Kukadi in progress

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील गायरानात उभारल्या जात असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून अडीच महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी अडवणूक केल्याने हे काम रखडले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून ८ मेगावॉट क्षमतेची वीज निर्मिती होणार असून शेतकऱ्यांसाठी ऊर्जा क्रांतीचा ठरणार आहेत.

Solar Power Project
रेशन दुकानांतून साखर देण्याची मागणी

भोकरदन तालुक्यातील आन्वा व दानापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पामुळे ऊर्जा क्रांतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कुकडी येथे ८ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची भारनियमनाच्या कचाट्यातून कायमस्वरूपी मुक्तता झाली असून त्यांना आता शेतीसाठी दिवसा वीजप रवठा सुरू झाला आहे.

गेली अनेक वर्षे शेतीसाठी रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करावे लागत होते. रात्रपाळीत होणाऱ्या या पुरवठ्यामुळे साप, विंचू, बिबट्या आणि अन्य निशाचर प्राण्यांचा सामना करण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात कायम होती.

Solar Power Project
पाच बालकामगारांची प्रशासनाने केली सुटका

या त्रासातून आता बळीराजाची सुटका झाली आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सिंचनासाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर मिळाल्याने शेतीची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. विजेचा अडथळा टाळल्याने पिकांचे नुकसानही टळणार असल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत होते. यामुळे वन्यप्राण्यांचा धोका आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या सौर प्रकल्पामुळे आन्वा व दानापूर उपकेंद्राशी जोडलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज उपलब्ध होईल. यामुळे सिंचनाचे नियोजन सुलभहोऊन शेती उत्पादनात मोठी वाढ होईल.
आ. संतोष दानवे, भोकरदन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news