पाच बालकामगारांची प्रशासनाने केली सुटका

एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल, कारवाईने खळबळ
jalna crime news
पाच बालकामगारांची प्रशासनाने केली सुटकाFile Photo
Published on
Updated on

Administration releases five child laborers

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच एका आस्थापना मालकावर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

jalna crime news
अतिक्रमण हटवा, अन्यथा पेन्शन रोखणार !

जालना जिल्ह्यात बालकामगार शोध मोहिमेसाठी जिल्हा बालकामगार अधिकारी, चाइल्ड हेल्पलाईन, पोलिस प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे एक विशेष संयुक्त पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकले.

या कारवाईत पाच अल्पवयीन मुले काम करताना आढळली. यात एका १४ वर्षांखालील बालकाचा आणि १६ वर्षांवरील चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले आहे. समितीच्या आदेशानुसार या मुलांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

jalna crime news
रेशन दुकानांतून साखर देण्याची मागणी

दरम्यान, बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका मालकावर कठोर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जालना शहरात हॉटेल्स, गरेजसह इतर ठिकाणी मोठ्या संख्येने बालकामगार काम करताना दिसत आहेत.

दोषी मालकास ३ महिने कारावास व दंड

१४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार, दोषी मालकास किमान ३ महिने कारावास आणि २० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १०९८ या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news