

Well cleaning campaign through Shramdana
परतूर, पुढारी वृत्तसेवा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा २.०) अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, परतूर यांच्या वतीने परतूर तालुक्यातील पाटोदा (माव) येथे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत लोकसहभाग आणि श्रमदानातून बारव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी डी. बी. सांगवे, सहायक कृषी अधिकारी बालाजी चिकटवाड, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन समन्वयक विष्णू पिवळ, समितीचे अध्यक्ष तथा सरपंच हरिभाऊ नारायण खवल, प्रगतिशील शेतकरी नाथाभाऊ खवल, समूह सहायक अनिल भानुसे, अशोक कांदे, एकनाथराव खवल, मुरलीधर खवल, अनंत खवल, अंगद कांदे, जगदीश कानोडे, महादेव खवल, गौतम मुंडे, गोविंद काळे, विष्णू खवल, माधव खवल, पार्थ नखाते यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी बांधव, स्वयंसेवक तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन समन्वयक विष्णू पिवळ यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत पाणी साठवण, मृद व जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवावत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सामूहिक कामांना प्राधान्य
शेतीमध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचा ताळेबंदानुसार वापर करावा. लोकसहभागाच्या माध्यमातून सामूहिक कामांना प्राधान्य द्यावे. -डी. बी. सांगवे, मंडळ कृषी अधिकारी.