Purna-Jalna special train : पूर्णा-जालना विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द

परिचालन विषयक कारणांमुळे दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा-जालना आणि जालना-पूर्णा विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एक फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Purna-Jalna special train
Purna-Jalna special train : पूर्णा-जालना विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्दfile photo
Published on
Updated on

Two trips of the Purna-Jalna special train cancelled

जालना, पुढारी वृत्तसेवा परिचालन विषयक कारणांमुळे दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा-जालना आणि जालना-पूर्णा विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एक फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Purna-Jalna special train
Nanded Railway Scam | बेजबाबदार अधिकाऱ्यांना हटवा; रेल्वे प्रकल्प वाचवा : महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०७०५७ पूर्णा-जालना विशेष ही १२ जुलै रोजीची नियोजित फेरी रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक ०७०५८ जालना-पूर्णा विशेष ही दि. १६ जुलै रोजीची नियोजित फेरीदेखील रद्द राहणार आहे.

Purna-Jalna special train
Beed Sand Mining Case : घरकुल लाभार्थ्यांची चौकशी; गोदावरी पात्राची मोजणी

या निर्णयामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे. या मार्गान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे चौकशी सेवा, हेल्पलाईन किंवा अधिकृत रेल्वे संकेतस्थळावरून या बाबतची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड मंडळाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news