

Two groups of sand mafia in Davargaon
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील पुर्णानदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने खुलेआम बाळूची तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय आहे. या ठिकाणी वाळूमाफियाचे दोन गट झाल्याने एका गटाने टेंभुर्णी येथील वाळूमाफियांना वाळू उपसा करण्यास विरोध केला आहे.
डावरगाव देवी येथील पुर्णानदी पात्रातून डावरगाव येथील दोन राजकीय गटाच्या आपसातील वादाने टेंभुर्णी येथील वाळू वाहतूक करणायाँना मज्जाव करण्यात आला. यामुळे दहा ते पंधरा टैक्टर चालकांनी डावरगाव येथील वाळू माफीयाचे लोकेशन तहसीलदार यांना माहिती पुरविण्यात आली.
दहा पंधरा जणांनी एक टिम तयार करून टेंभुर्णी येथील वाळूमाफियांना वाळू उपसा करण्यास विरोध केला आहे. यामुळे डावरगाव देवी व टेंभुर्णी येथील वाळू माफीयाचे धुमसान दिसत आहे. यामुळे एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू माफीया मध्ये वाद होऊन हानीकारक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेळीच महसूल विभागाने व स्थानिक पोलिसांनी त्यांना माहीत असलेल्या अवैध वाळू चोरी करणार्या वर वेळीच पाऊबंद घालावा नसता यांचे लोण सर्वत्र पोहचवून वाळू माफीया चे टोळी युद्ध सुरू होईल अशी शक्यता आहे.