

Like Sambhajinagar, drugs are being sold in Jalna too!
जालना, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडेच टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये सव्वा कोटी रुपयांची मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज व अमली पदार्थ खुलेआम विक्रीस उपलब्ध असल्याचे वास्तव यामुळे उजेडात आले आहे. हीच परिस्थिती जालना शहरातही असून, अशाप्रसंगी मुलांना ड्रम्सपासून दूर ठेवण्यासाठी सजग पालकाची गरज आहे, असे मत बाल न्याय मंडळाच्या सदस्य अॅड. अश्विनी महेश धन्नावत यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अॅड. अश्विनी धन्नावत यांनी म्हटले आहे की, शाळा व महाविद्यालयीन वयातील विद्यार्थी सहजपणे ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकत आहेत. सुरुवातीला हे व्यसन 'स्टाईल' म्हणून सुरू होते. मात्र, पुढे जाऊन हेच व्यसन बनुन त्यांचे आयुष्यच उद्धस्त करते.
काही लहान मुले घरातील ज्येष्ठ नागरिकांचे पैसे चोरून हे पदार्थ खरेदी करत आहेत. ही परिस्थिती खूपच चिंताजनक असून तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर इनरव्हिल क्लब ऑफ जालना होरायझन, जालना महानगरपालिका आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत.
विद्यार्थ्यांना या व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्याबरोबरच पालकांनाही सजग राहण्याचे आवाहन या उपक्रमांतून करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याच विषयावर स्वतः हुन जनहित याचिका दाखल करत गंभीर दखल घेतलेली आहे. या याचिकेत जालना येथील स्थितीचा मुद्दा अधोरेखित झाला असून, येथेही सतर्कतेची गरज असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. आवश्यक वाटल्यास आपण स्वतः या याचिकेत पक्षकार म्हणून सहभागी होण्याचा विचार करत असल्याचे अॅड. अश्विनी धन्नावत यांनी म्हटले आहे.
जर पालकांना मुलांच्या वागण्यात अचानक बदल जाणवत असेल तर त्यांना रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून घेणे गरजेचे असल्याचे अॅड. घत्रावत यांनी स्पष्ट केले. अशावेळी पालकांनी घाबरून न जाता तात्काळ उपाययोजना कराव्यात व आवश्यक असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याच विषयावर स्वतःहून जनहित याचिका दाखल करत गंभीर दखल घेतलेली आहे. या याचिकेत जालना येथील स्थितीचा मुद्दा अध-ोरेखित झाला असून, येथेही सतर्कतेची गरज असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे.