Jalna Fraud Case : वन खात्यात नोकरीचे आमिष दाखवून 4 लाखांची फसवणूक

दोन जणांना अटक, दुचाकीसह 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Partur Fraud Case
जालना ः परतूर तालुक्यातील खांडवी येथील फसवणूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर संशयित आरोपीसह पोलिस अधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः परतूर तालुक्यातील खांडवी येथील युवकास वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 4 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली . या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परतूर तालुक्यातील खांडवी येथील उमेश विजयकुमार जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, आरोपींनी त्यांना वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेऊन प्रशिक्षणाचे बनावट आदेशही देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Partur Fraud Case
Job fraud in Beed| महापारेषणमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी निलेश गोविंदा झाटे (वय 29, रा. वसाली, ता. पातूर, जि. अकोला) आणि राहुल गजानन कदम (वय 26, रा. जुनना, ता. मेहकर, जि. बुलडाणा) यांना नाव्हा चौफुली परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी तक्रारदाराला 15 लाख रुपयांत वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिल्याचे समोर आले. पहिल्या टप्प्यात 4 लाख रुपये घेतल्यानंतर राहुल कदम याने मोबाईलमधील ‌‘पिक्स आर्ट‌’ ॲपच्या सहाय्याने बनावट प्रशिक्षण आदेश तयार केला होता. तो आदेश निलेश झाटे याच्या व्हॉट्सॲपवरून तक्रारदाराला पाठवण्यात आला होता.

Partur Fraud Case
Yavatmal Fraud : शासकीय नोकरीच्या नावाखाली सहा लाखांनी फसवणूक

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रोख रक्कम जप्त

पोलिसांनी आरोपींकडून रोख 1 लाख 45 हजार रुपये, 1 लाख 40 हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल, तसेच 20 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news