Job fraud in Beed| महापारेषणमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक

जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

परळी वैजनाथ : महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील दोघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Job Fraud
Yavatmal Fraud : शासकीय नोकरीच्या नावाखाली सहा लाखांनी फसवणूक

तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना येथील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क होता. दरम्यान, ऋषिकेश याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

Job Fraud
Fake Umrah visa fraud-'उमराह खिदमत'च्या नावाखाली बनावट व्हिसा देत तरुणांची फसवणूक

फिर्यादीने २९ डिसेंबर २०२४ रोजी महापारेषण विभागाच्या सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा दिल्यानंतर ऋषिकेश याने संपर्क साधला. त्याने इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगत, मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील आरोपींच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी तडजोडीअंती ८ लाख रुपये आगाऊ देण्याचे ठरले. त्यानुसार रोख रक्कम तसेच बँक व्यवहाराद्वारे आरोपींना पैसे देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Job Fraud
Nashik Fraud Case | नोकरीचे आमिष दाखवून ९८ लाखांची फसवणूक

फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपींनी बनावट निकाल यादी दाखवून फिर्यादीचे नाव निवड यादीत असल्याचे सांगितले. तसेच “पार्टी”साठी आणखी दोन हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचाही आरोप आहे. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता, “वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.यानंतर पैसे परत मागितल्यावर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराटे (वय २८) व सुनील वायुराव खराटे (वय ५०, दोघेही रा. एकलहरा, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news