Jalna News : शहरात आईच्या नावाने लागवड केलेल्या वृक्षाकडे मुलांचे दुर्लक्ष

पाण्याअभावी वृक्ष सुकले, वृक्षांची दुरवस्था, पाणी देण्याची गरज
Jalna News
Jalna News : शहरात आईच्या नावाने लागवड केलेल्या वृक्षाकडे मुलांचे दुर्लक्षfile photo
Published on: 
Updated on: 

Trees planted in the city in the name of mothers are being neglected by their children

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : "एक पेड माँ के नाम" या अभियानांतर्गत शहरात अनेकांनी लागवड केलेल्या वृक्षांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. संवर्धनाकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याने लागवड केलेले सर्व वृक्ष सुकले आहेत. तर काही पूर्णतः वाळून गेले आहेत. मात्र भिंतीवर वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तींची आपले मोठे अक्षरातील नावे जसेच्या तसे आहेत.

Jalna News
Jalna News : अखेर प्रशासन ऊसतोड कामगारांच्या फडावर दाखल

शहरात १०० पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली. शहरात जालना रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापासून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकापर्यंत बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीवर आपल्या आईचे नावे टाकून अनेकांनी झाडे लावली विशेष म्हणजे याला कुंपणही करण्यात आलेले आहे. प्रत्येकाने झाडांची लागवड केली अभियानात सहभाग घेतला मात्र वृक्षाच्या संवर्धनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे चांगल्या स्थितीत असलेली लहान लहान झाडे सुकत आहे.

Jalna News
Quantum Computers : क्वांटम संगणकांच्या मर्यादा समजून घेणे गरजेचे

विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष पाऊसही अत्यल्प झाला पावसाळ्यातच उन्हाळा सुरू झाला. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई त्यात या झाडांकडे कुणाचेही लक्ष नाही. सर्वजण या रस्त्यावरून रोज येणे जाणे करतात मात्र या झाडांकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे या झाडांचे संवर्धन होणे जरूरी असून शिल्लक असलेल्या झाडांना पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे ज्यांची झाडे पूर्णतः वाढली आहे तेथे नवीन झाडे लावून आपल्या आईच्या नावाने लावलेली झाडे कायम ठेवण्याचे सर्वांपुढेच आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.