Jalna News : अखेर प्रशासन ऊसतोड कामगारांच्या फडावर दाखल

त्या' ऊसतोड महिलेच्या नवजात शिशुला महिला व बाल रुग्णालयात उपचारार्थ केले दाखल
Jalna News
Jalna News : अखेर प्रशासन ऊसतोड कामगारांच्या फडावर दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News: Administration finally reaches the sugarcane harvesters' campsite

जालना, पुढारी वृत्तसेवा शासनाकडून महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चुन विविध योजना कागदावर राबवल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ऊसतोड कामगारांच्या नशिबी 'वनवास' कायम असल्याचे भीषण वास्तव समोर आले. पारडगाव (ता. घनसावंगी) परिसरात जारी ऊसतोडीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेची कोणतीही आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे थेट उसाच्या फडातच दि. २५ रोजी प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Jalna News
Jalna News : नापिकीचा फटका, कर्जाचा विळखा; ४४ शेतकरी कुटुंबे मदतीविना !

आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दै. पुढारीने दि. २७ रोजी 'ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची होतेय परवड' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

या वृत्ताची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तातडीने चौकशी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून दि. २६ रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पथकाने पारडगाव ता. घनसावंगी परिसरातील ऊसाच्या फडात जावून प्रसुती झालेल्या जळगावच्या महिलेची व तीच्या नवजात शिशूच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर गुरूवार, दि. २९ रोजी त्या ऊसतोड महिलेला व तिच्या नवजात शिशुला जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी घनसावंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांची उपस्थिती होती.

Jalna News
Jalna News : ढगाळ वातावरणानंतर थंडीची जिल्ह्यात एन्ट्री

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचार

प्रसूतीच्यावेळी त्या महिलेला टाके पडले होते. शिवाय, बाळाचे वजन कमी असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी ऊसतोड महिला आणि तिच्या नवजात शिशुच्या आरोग्याला प्राधान्य देत त्वरित उपचारार्थ जालना शहरातील जिल्हा व महिला रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या नवजान शिशूवर उपचार सुरू असून तब्यत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.