Shagad Accident | शहागड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात ३ जण गंभीर जखमी

कारची बसला जोराची धडक, पिकअपची पोलीस वाहनाला धडक
  Shagad Road Accidents Serious Injuries
शहागड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Shagad Road Accidents Serious Injuries

शहागड : बस चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या कारची जोराची धडक बसून कार मधील दोनजण गंभीर तर चार जणांना किरकोळ मार लागला. ही घटना मंगळवारी दुपारी सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर शहागड (ता.अंबड) येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार (केए. २८. झेड. ७७३२) विजापूरकडे जात होती. दरम्यान सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर शहागड (ता.अंबड) येथे समोर चालणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - बीड बस ( एम.एच.२३.एयू.६२२५) च्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागील कार बसला पाठीमागून जोराची धडकली.

  Shagad Road Accidents Serious Injuries
Child Death Dog Attack | जालना शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवासी बचावले. तर कार चालक प्रकाश सोन्नद व अन्य एकाला गंभीर मार लागला. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी कार महामार्गाच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. गंभीर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

शहागड येथे मद्यधुंद पिकअप चालकाची धडक; पोलिस वाहनाचे नुकसान, एक जखमी

शहागड: अंबड तालुक्यातील शहागड येथे मंगळवारी (दि. 28) झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे शासकीय वाहन नुकसानग्रस्त झाले असून, एक जण जखमी झाला आहे. बाजीराव माणिकराव सरोदे (वय 42), चालक — छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस, हे बीडकडे जात असताना, त्याच दिशेने येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एमएच-57-बी-0269 ने भरधाव वेगात त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली.

पिकअप चालक योगेश बळीराम जगताप (रा. छत्रपती संभाजीनगर) हा अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील शहागड शिवारात झालेल्या या धडकेत पोलिस जीप (एमएच-20-जीके-1494) चे मोठे नुकसान झाले. धडकेनंतर पिकअप वाहन डिव्हायडरला जाऊन आदळले असून, चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

  Shagad Road Accidents Serious Injuries
Jalna News : जालना शहरातील ४२ झोपडपट्टयांतील कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कलम 281, 125, 125(अ), 324(4) व मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार रामदास केंद्रे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news