

The Jalna Municipal Corporation general election process has begun.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा याकरिता आपण आई तुळजाभवानीला साकडे घालणार असून, ते निश्चितच पूर्ण होईल, असे मत गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
मंगळवार, दि. २३ रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. संतोष दानवे, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, भाजपा जालना महानगर माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आपण आज तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता आपण तुळजापूरला निघालो आहे. आमचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हा जिल्हा आहे. याठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. येथील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीची निवडणूक तयारीविषयी माहिती जाणून घ्यावी, यासाठी येथे आलो आहे. भाजपा एक नंबरचा पक्ष आहे. आपल्या पक्षाला अजून बळकटी कशी देता येईल, यासाठी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. जालन्याच्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आ. संतोष दानवे, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, राजेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, अर्जुन गेही, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, शिवप्रकाश चितळकर, अरुणा जाधव, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शुभांगीताई देशपांडे, सखुबाई पणबिसरे, वर्षा ठाकूर, ममता कोंड्याल, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, सुहास वैद्य आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.