

The Immoral Human Trafficking Prevention Cell succeeded in locating the abducted victim and the accused.
जालना, पुढारी वृत्तसेवा : फूस लावून पळून नेलेल्या पीडितेसह आर-ोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोघांना आव्हाळवाडी ता. हवेली जि.पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, घनसावंगी पोलिस ठाण्यात दि. ११ जून २०२५ रोजी मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा तपास न लागल्याने पोलिस अधीक्षक अयजकुमार बंसल यांच्या आदेशाने या गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे दि. १० सप्टेंबर २०२५ वर्ग करण्यात आला.
शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार नेमले. आरोपी व पीडिता हे आव्हाळवाडी, ता. हवेली जि.पुणे येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीवरून आव्हाळवाडी येथे पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील पीडित व आरोपीस पुढील तपास कामी घनसावंगी पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे, मपोउपनि दिपाली शिंदे, पोउपनि रवींद्र जोशी, पोउपनि संजय गवळी, पोहेका कृष्णा देठे पोहेकों सागर बाबीस्कर (स्थागुशा), महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा पुष्पा खरटमल, र आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलिस अंमलदार संजय कुलकर्ण यांनी केलेली आहे.