Cotton Crop Damage : अति पावसाने 'पांढरे सोने' काळवंडले

मकाला अंकुर फुटण्याची भीती ! शेतकऱ्यांची चिंता वाढली, अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल
Cotton Crop Damage
Cotton Crop Damage : अति पावसाने 'पांढरे सोने' काळवंडले File Photo
Published on
Updated on

The cotton crop, known as the 'white gold' of farmers, has now turned black due to heavy rains.

जालना, पुढारी वृत्तसेवा अति पावसाने शेतकऱ्यांचे 'पांढरे सोने' माणून ओळखले जाणारे कापूस पीक आता काळवंडले आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून कापसाच्या झाडांवर बोंडगळ दिसू लागली आहे. शिवाय, सोंगून ठेवलेल्या मकाच्या पिकात पाणी शिरल्यामुळे मकाला अंकुर फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

Cotton Crop Damage
Jalna News : मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा रेल्वे मार्ग : डॉ. लाखे

हातात आलेला कापूसही आता बाजारात घेऊन जाण्याच्या अवस्थेत नाही. येली अलर्ट पुन्हा नोव्हेंबरपर्यंत जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंता रेषा उमटल्या आहेत. पुन्हा आठ दिवस जालना जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कापूस चांगला फुटला असला तरी ग्रामीण भागात वे चणीसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकरी १२ रुपये किलो मजुरी देऊनही कामगार मिळत नसल्याने पीक शेतातच सडत आहे.

कापूस वेचण्यासाठी महिलांचा मोठा सहभाग असतो, परंतु पावसामुळे चिखलात जाणे अवघड झाल्याने त्यांनीही कामे नाकारली आहेत. त्यामुळे कष्टाने उभे केलेले पीक आता शेतातच नाश पावत आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करून कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Cotton Crop Damage
Jalna News : मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा रेल्वे मार्ग : डॉ. लाखे

कपाशी, तूर, मका पिकाचे नुकसान अस्मानी संकटाने शेतकरी हतबल

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी व श्रेष्टी परिसरात मंगळवार दि. २८ रोजी दुपारी झालेल्या प्रतीच्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी शिरले. रात्री देखील पावसाची मुसळधार सुरूच होती. यामुळे उभ्या शेतातील कपाशी, तूर, मका, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सततच्या या पावसामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी पास अस्मानी संकटामुळे हिरावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळी गेली, दसरा गेला तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांवर अवकाळी संकट येत्या १ नोव्हेंबरपर्यंत घोंघावणार असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने १ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर पडताना शेकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांच्या उघड्या डोळ्या देखत पिके वाया जात असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांतून केल्या जात आहे.

यंदा पावणे तीन लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा

जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचे कपाशीचे क्षेत्र सुमारे ३ लाख २२ हजार ३२६ इतके आहे. मात्र, यंदा सुमारे २ लाख ७९ हजार ९५६ इतक्या हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला. म्हणजे ४३ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे कमी झाले. सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ झाली. असे असले तरी सध्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय, बोंड सड़त चालली आहे. कापसाचा दर्जा देखील घसरत चालला आहे.

दिवाळीच्या पूर्व संध्येला सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आधी अतिवृष्टीमुळे ८० टक्के पिकांची नासाडी झाली. त्यातून उरलेसुरले पिके हाती येईल आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने दगा दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
- विठ्ठल बावणे, शेतकरी वाकडी.

वेचणीला आलेल्या कापसाची नासाडी

गेल्या पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. वेचणीला आलेल्या कापसाचे परतीच्या पावसाने पार नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news