

आन्वा (जालना) : राज्य शासनाने दिवाळीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या भाऊबीज भेटीची घोषणा केली होती. रक्कम दिवाळीपूर्वी खात्यात जमा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र दिवाळी सरली भाऊबीजही निघून गेली. तरीही रक्कम मिळाली नाही. काहींना प्रोत्साहन भत्ताही न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उत्साह मावळला असून सणाचा आनंद नाराजीच्या सावटाखाली गेला आहे.
महिला बालविकास विभागामार्फत राबतिण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत भंगणवाडी सेविका आणि मदतनीस गावपातळीवर महत्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य, पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित होता. त्या सातत्याने देतात. आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक पोषण आहार लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी वितरण, महिलांना आरोग्य कुटुंब नियोजन विषयक मार्गदर्शन, तसेच पोषण ट्रॅकरसारख्या योजनांची अंमलबजावणी ही त्यांच्या जबाबदारीतील प्रमख कामे आहेत. मात्र, अनेकदा मानधनातील विलंब आणि शासकीय अडचणीचा सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांचा आनंद वाढवण्यासाठी शासनाने दोन हजार रूपयांच्या भाऊबीज भेटीची घोषणा केली होती. परंतु भाऊबीज उलटवून गेली, तरीही रक्कम खात्यात जमा झाली नाही.
राज्य शासनाने दिवाळीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना २ हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा केली होती. इतकेच नाही, तर दिवाळीपूर्वी ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगितले होते. पण, आता दिवाळी झाली आणि भाऊबीजही आटोपली तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात भाऊबीज भेट रक्कम जमा झाली नाही. काहीना वर्षभरापासून प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही.
अंगणवाडी सेविकांना भाऊबीज व प्रोत्साहन भत्ता शासनाकडून जाहीर करण्यात आला होता, अद्यापही खात्यात रक्कम जमा झाले की नाही या संदर्भात चौकशी करून सांगता येईल.
आर.बी. जाधव, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, भोकरदन
शासनाने दिवाळीपूर्वी मानधन आणि भाऊबीज भेट दिली नाहीच, परंतु तालुक्यातील काही अंगणवाडी सेविकांना गेल्या वर्षभरापासन प्रोत्साहन भत्ताही देण्यात आलेला नाही. दोन हजारांच्या भाऊबीज भेटीची अपेक्षा होती, परंतु त्यांच्य खात्यात रक्कम जमा झालीच नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.