

The corn cobs in the field were swept away.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात शनिवारी (दि.१) मध्यरात्री परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातून पाणी वाहिले. या पाण्याबरोबर शेतातील मकाचे कणसे वाहिले आहे. यामुळे शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दहा दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पडून असलेल्या मकाच्या कंसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे शेतात पडून असलेल्या मकाची गंजी रात्री आलेल्या पावसामुळे पाण्याने वाहन विहिरीत, नाल्यामध्ये वाहत गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
रात्री झालेला पाऊस पिंपळगाव रेणुकाई, देहेड, वरुड सह अन्य भागात जोरदार पाऊस झाला असल्याने देहेड परिसरातील काही भागांमध्ये ढगफुटी दृश्य पाऊस झाला असल्या कारणाने येथील काही शेतकऱ्यांचे मका पिके पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास सुद्धा पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे देहेड येथील शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकरी यांनी माहिती देण्यासाठी तलाठी यांना केला. परंतू तलाठी यांनी फोन घेतला नाही. तसेच परत कॉलही केला नसल्याने शेतकरी यांच्यातून तीव्र नार- 165 ाजी पसरली आहे. याकडे तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.