Jalna News : मुख्यमंत्र्यांनी अडचणीतील शेतकरी अन् मजुरांना डिटेक्ट करावे : आ. रोहित पवार

अंबड तालुक्यातील डोमेगाव व दुनगाव येथे दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
Jalna News
Jalna News : मुख्यमंत्र्यांनी अडचणीतील शेतकरी अन् मजुरांना डिटेक्ट करावे : आ. रोहित पवारfile photo
Published on: 
Updated on: 

The Chief Minister should detect farmers and laborers in trouble: MLA Rohit Pawar

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवाः मुख्यमंत्री साहेब, डिटेक्ट करायचंच असेल तर आज अडचणीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या भावना डिटेक्ट करा आणि बळीराजाला हेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये मदत द्या अशी मागणी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अंबड तालुक्यातील डोमेगाव, दुनगाव दुष्काळामुळे जळालेल्या पिकांची पाहणी केली मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून निशाणा साधला.

Jalna News
Ganesha visarjan 2026 : गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

अंबड तालुक्यातील डोमेगाव व दुनगाव येथील शेतकरी बांधवांची भेट घेऊन आ. रोहित पवार यांनी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, मका, बाजरी, तूर, ऊस आदी पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, भाऊसाहेब कनके यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात लावलेले बॅरैकेटस व मेटल डिटेक्टर वरून टीका करतांना रोहीत पवार म्हणाले कि, मुख्यमंत्री, भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बाँबही पिकवायला लागला का? त्याममुळेच शेतातही मेटल डिटेक्टर लावण्याची वेळ या सरकारवर आली, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला. देशात प्रथमच असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय हा बळीराजाचा आणि गरीबांचा अवमान आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना आ. पवार म्हंणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच स्थानिक नेत्यांनीच अडचणीत आणायचं ठरवलंय की काय अशी शंका येते. दुष्काळाची पाहणी शेतात जाऊन करायची असते, तशी सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी ती केली. मात्र एके ठिकाणी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी चक्क शेतात टेबल लावून एखाद्या प्रदर्शनात मांडल्याप्रमाणे जळालेलं पीक आणून त्या टेबलवर ते पाहण्यासाठी ठेवले.

Jalna News
Jalna Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

आधी पोलिसांनी शेतात मेटल डिटेक्टर लावले आणि आता टेबलावर जळालेली पिकं ठेवली. हसावं की रडावं अशा नेत्यांवर? असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला. दुष्काळ पाहणी दौऱ्यात पोलिस शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आडवत असल्याचे पहावयास मिळते. 'कडक' खादी घातलेल्यांना लगेच सोडलं जातं. शेतकऱ्यांनी वस्तूस्थिती सांगू नये म्हणून असं अडवलं जातंय का? की हा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर पुढाऱ्यांसाठी आहे? उद्या शेतकरी आणि मजुरांनीही अशीच 'कडक' भूमिका घेतली तर ते या सरकारला परवडेल का? अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.

यावेळी बोलतांना रोहीत पवार म्हणाले कि, मागील तीन-चार दिवसांत मी संपूर्ण मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करून शेकडो शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासनाच्या माध्यमातून करावयाच्या मदत व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

काही भागात नुकताच परतीचा थोडा-फार पाऊस झाल्याने काही पिके बाहेरून हिरवी दिसत असली, तरी त्यातून एक मूठभरही उत्पादन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजूरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news