Jalna Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

राजूर- जालना रस्त्यावरील पिरपिंपळगाव येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jalna Accident News
Jalna Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूfile photo
Published on: 
Updated on: 

Young two-wheeler rider dies after being hit by an unidentified vehicle

जालना, पुढारी वृत्तसेवाः राजूर- जालना रस्त्यावरील पिरपिंपळगाव येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कैलास दिलीप मिसाळ (वय २६, रा. नूतनवाडी, पिरपिंपळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Jalna Accident News
Ganesha visarjan 2026 : गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

रंगकामाचा व्यवसाय करणारे कैलास मिसाळ हे दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास काम आटोपून आपल्या दुचाकीने (एमएच-२१ बीडब्ल्यू -5844) घराकडे परतत होते. पिरपिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आल्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या कैलास यांचा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Jalna Accident News
Audit of development works : विकासकामांचे ऑडिट; अधिकाऱ्यांची 'ऑन द स्पॉट' कारवाईc

अपघातानंतर चालक माहिती न देता वाहनासह पसार झाला. मृत कैलास मिसाळ यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर यांचे भाऊ विलास मिसाळ यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गंभीर पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news