Ganesha visarjan 2026 : गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज

१,५०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त, परिसर ९० सीसीटीव्हींच्या टप्प्यात, मोती बाग परिसरात १० कृत्रिम हौद तयार
Ganesha visarjan 2026
Ganesha visarjan 2026 : गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्जfile photo
Published on: 
Updated on: 

Administration ready to Ganesha visarjan

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा, यासाठी शहरात १,५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच २० ठिकाणी सीसीटीव्ही आणि पाच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे.

Ganesha visarjan 2026
Jalna News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष दानवे यांच्याकडून पीक पाहणी

मोतीबाग परिसरात लहान गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी १० कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी पाच क्रेन, सात तराफे आणि लहान मूर्तीसाठी पाच बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी नांदेड येथून ५० प्रशिक्षित जलतरणपटूंचे पथक पाचारण करण्यात आले असून, ७५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील सुमारे ३५० सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. त्यापैकी १८ फुटांपेक्षा उंच मूर्तीच्या मिरवणुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक मामा चौकातून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मोती तलाव विसर्जन कुंडापर्यंत जाणार आहे. नागरिकांनी मूर्ती व निर्माल्य निश्चित केलेल्या विसर्जन कुंडांवरच द्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यवतीने करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनासाठी वाहतूक मार्गात बदल

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा टांगा स्टैंड सराफा बाजार-पाणीवेस-सुभाष चौक या मार्गावरून जुन्या जालन्याकडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मंगल बाजार, चमन बाजार, राजमहल टॉकीजजवळील पुलावरून ग्लोबल गुरुकुल शाळेजवळून बायपास रोडने अंबड चौफुली, नूतन वसाहत मार्गे वळविण्यात येणार आहे.

Ganesha visarjan 2026
Women Farmer Certification : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

नवीन जालना-सदर बाजार परिसर रहेमान गंज-मुर्गी तलाव परिसर-जवाहर बाग चौकी परिसरातील वाहतूक मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुन्या जालन्याकडे जाण्यासाठी जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिशटेकडी मार्गे वळविण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनकडून मंमादेवीमार्गे गांधी चमन व मंमादेवी मार्गे नवीन जालन्यात जाणारी वाहतूक नूतन वसाहत, अंबड चौफुली व मंठा चौफुली मार्गे वळविण्यात येणार आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरकडून जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी वाहतूक ग्रेडर टी पॉइंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने वळविण्यात येणार आहे. शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीची गणेश मंडळांनी तयारी केल्याचे दिसून येत आहे.

घाणेवाडी तलावात विसर्जनास मनाई

संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशय हा जालना शहराचा मुख्य पाणीपुरवठा स्रोत असल्याने येथे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरगुती गणेशमूर्ती व निर्माल्य महापालिकेच्या निश्चित केलेल्या विसर्जन कुंडांवरच जमा करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

भोकरदन येथे गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण

गणेश विसर्जनासाठी भोकरदन येथे जुन्या बाजारपट्टीतील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला नगरपरिषदेने बांधलेला विसर्जन (कुंड) हौद व समता नगर मधील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये नगर परिषदेच्या वतीने दोन ठिकाणी गणपती विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणूक मार्ग सुरळीत असल्याची माहिती भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी दिली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व सहा पोलीस अधिकारी यांच्यासह एसआरपीएफचे दोन प्लाटून सर्व होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. १८ सार्वजनिक मंडळी असून भोकरदन पोलीस ठाणे हद्दीमध्ये १३५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. अशी माहिती भोकरदन पोलीस ठाण्याची प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news