

The canal repair work has stopped due to a shortage of diesel.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा
भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सेलूद येथील धामणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी पाट नादुरुस्त होते. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले हे दैनिक पुढारीच्या वृत्तानंतर काम गेल्या आठवड्यात सुरू झाल्यानंतर चार दिवसांतच डिझेलअभावी पुन्हा बंद पडले आहे.
याबाबत पाटबंधारे विभाग स्थानिक पातळीवर संपर्क केला असता निश्चितपणे काहीच सांगता येणार नाही असे सांगितले. एकंदरीतपणे या हंगामात पाट पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभाग गंभीर नाही असे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मक्का आदी पिकांना पाणी देण्यासाठी पाटाला पाणी शंभर टक्के वर फुल धामणा धरण भरले आहे.
परंतु त्यांना धरणात येणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे हलगर्जी पणा होत असल्यामुळे शेतातील रब्बी हंगामामध्ये होणाऱ्या शेतातील मालाला पाणी देता येत नसल्याने सध्या डिसेंबर महिना वरचेही संपत आले आहे. परंतु अद्यापपर्यंत दहा किलोमीटर होणाऱ्या या पाठाचे काम संत गतीने सुरू आहे.
त्यातच गेल्या चार ते पाच दिवसांपासून मशीन डिझेल नसल्यामुळे मशीन हे कार्यालयाच्या बाजूला उभी करून ठेवले आहे. परंतु संबंधित अधिकारी यांना विचारले असता यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे मशिन कशामुळे बंद आहे हे माहिती देत नसल्यामुळे हे काम बंद आहे असे दिसून येत आहे.
मुबलक पाणी
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्य लक्षात घेऊन या मशीन साठी ज्या काही अडचणी येत असेल त्या पूर्ण करून तात्काळ पाठाचे काम तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.