

Enforcement of the code of conduct, 30 teams deployed.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आच-ारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, निवासी जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची या कक्षाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने विविध स्वरूपाची ३० पथके तैनात केली आहेत. या पथकांमध्ये अनुभवी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बळाचा समावेश आहे. प्रत्येक पथकासोबत ३ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सर्व पथके निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांना काही तक्रार करायची असल्यास, प्रशासनाने ०२४८२-२२३१३२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, अवैध व्यवहार किंवा आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी प्रशासन कडक पावले उचलत असल्याचे कक्ष प्रमुख शशिकांत हदगल यांनी स्पष्ट केले आहे.