रेणुकादेवी यात्रेत दहा क्विटल रेवड्यांची उधळण

लाखोंच्या कुस्त्यांची दंगल, लाठी-काठी अन् मल्लखांबवर कसरती
Renukadevi Yatra
रेणुकादेवी यात्रेत दहा क्विटल रेवड्यांची उधळणfile photo
Published on
Updated on

Ten Quintals of Revdis Showered at the Renukadevi Yatra

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील जागृत देवस्थान रेणुका देवी यात्रा महोत्सव बंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त गावात पारंपरिक संस्कृतीचा देखणा संगम पाहायला मिळाला. यावेळी भक्तांकडुन दहा क्विटल रेवड्यांची उधळण करण्यात आली.

Renukadevi Yatra
खोपेश्वर यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात

यात्रेची सुरुवात रेणुका देवीच्या पालखी मिरवणुकीने झाली. गावातील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी टाकून भक्तांनी देवीचे स्वागत केले. मिरवणुकीत भारूड गायन, लाठी-काठीचे खेळ, संबळ वादन, गोंधळी, बैलगाड्या व बँड पथकांचा मोठ्या उत्साहात सहभाग होता. यावेळी मल्लखांबवर चित्तथरारक कसरतीनी सर्वांचे लक्ष वेधले. गावाबाहेर स्थायिक असलेले नागरिक तसेच इतर राज्यांतील भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले.

दुसऱ्या दिवशी पारंपरिक मल्लखांब व वाघदाव मिरवणूक पार पडली. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाड्यांचे यात्रेत विशेष आकर्षण होते. युवकांनी मल्लखांबावर थरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सुमारे दहा ते बारा क्विंटल रेवड्यांची उघळण करण्यात आली.

Renukadevi Yatra
Dharur Jagdamba Devi Yatra : सोनिमोह्यात जगदंबा देवीची यात्रा

यानंतर दोन दिवस भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत् ारप्रदेश आदी राज्यांतील नामांकित पहलवानांनी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. कुस्त्यांसाठी २१०० रुपयांपासून ते ६१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली. सकाळी ९ ते रात्री ८.३० पर्यंत रंगलेल्या या दंगलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. धुळे व वाशिम येथील विजय वारा आणि ऋतिक राजपूत यांच्यातील प्रथम कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोघांनाही समान बक्षीस देण्यात आले.

चोख पोलिस बंदोबस्त

रेणुकादेवी मंदिरात 'पोत बंद' विधी करून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेदरम्यान पारध पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामस्थ व पंचकमिटीच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news