खोपेश्वर यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात

कुस्ती विजेत्याला चांदीची गदा
Dharashiv news
खोपेश्वर यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवातfile photo
Published on
Updated on

The Khopeswar yatra begins tomorrow.

ईट, पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत खोपेश्वर यात्रोत्सवास रविवारपासून (दि. २९) प्रारंभ होणार असून ही यात्रा मंगळवार पर्यंत असेल. यात्रोत्सवात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

Dharashiv news
Selu Yatra Festival : उद्यापासून श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव

श्री शंभू महादेवाच्या पदस्पर्शान पावन ईट येथे महादेवाची चार हेमाडपंथी मंदिरे आहेत. त्यापैकी एक श्री खोपेश्वर हे ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवताच्या यात्रेस सुरवात होत आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी छबिना निघणार आहे. यावेळी पालखीच्या ओट्यावर सजवलेल्या पालखीत शंभू महादेवाची मूर्ती ठेवली जाते. रात्री १२ वाजता आरती व पूजा करुन पालखी मिरवणूक निघते. ही मिरवणूक सकाळी पालखीच्या ओट्यावर येते. तेथे आरती व पूजा करुन पहिल्या छबिन्याची सांगता केली जाते.

मुख्य रस्त्यावरुन वाजत-गाजत यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही छबिना काढला जातो. यासाठी रोजगारासाठी बाहेरगावी राहणारे ग्रामस्थही गावात येतात. पेढा, साखर, गुळाच्या शेरण्या, नारळाचे तोरण बांधून वाजत-गाजत श्री शंभू महादेवाचा नवस फेडतात. यानंतर सोंगाच्या गाड्या निघतात. यात चालू घडामोडी व प्रबोधन करणारे देखावे साकारले जातात.

Dharashiv news
नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळा

सोग्याच्या गाड्या निघतात. या मध्ये विविध विषयांवर व सोंग सादर केली जातात. हे पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. रात्री १२ वाजता आरती करुन पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. या दिवशी परीट समाजाच्या वतीने पायघड्या घातल्या जातात. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लेझीम व बँड पथकासह शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. यात्र ोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी पालखीच्या ओट्यावर हजेरीचा कार्यक्रम होतो. यात सहभागी लोकांना यात्रा कमिटीच्या वतीने बक्षिसे दिली जातात.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात कुस्त्यांचा भव्य असा फड रंगतो. यात जिल्हाभरासह पर जिल्हामधून पैलवान सहभागी होतात. यात्रोत्सवाची सांगता ३१ माच रोजी कुस्तीच्या फडाने होणार आहे. हा कुस्ती चा महासंगमा जिल्हा परिषद प्रशाला च्या प्रगानात भरणार आहे. विजेता पैलवानास रोख रक्कम व चांदीची गदा देण्यात येणार आहे.

सहभागाचे आवाहन यात्रोत्सव कमिटीने केले आहे. ७१ हजार रुपयांचे प्रथम बक्षिस व चांदीची गदा हि देण्यात येणार आहे. हे बक्षीस दत्तात्रय भोरे जिल्हा परिषद सदस्य पाथूड यांच्या वतीने देण्यात येणार आहे. दुसरे ६१ हजारांचे बक्षिस व चांदीची गदा ईट येथील गणेश थोरात यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

तर तृतीय ५१ हजारांचे बक्षिस बाळासाहेब खरवडे पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने चतुर्थ ४१ हजारांचे बक्षीस डॉ. मनोज सासवडे तर पाचवे ३१ हजारांचे बक्षिस प्रतापराव भोईटे, सहावे २१ हजारांचे उमेश पानसरे यांचे तर सातवे ११११७ हजारांचे बक्षिस बालाजी हुंबे आणि रमेश भोसले, ज्ञानेश्वर डोके, उमेश सोन्ने, गणेश दिक्षित, सयाजी हुंबे, सुनील देशमुख, अशोक लिमकर यांच्याकडूनही प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच यासह पाच हजारांची बक्षिसेही मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहेत. यामुळे हा कुस्ती चा संग्राम चांगला रंगणार आहे. तरी कुस्ती चा संग्रामात सहभागाचे आवाहन सरपंच संजय आसलकर, यात्रोत्सव कमिटीचे नामदेव शिंदे, केशव चव्हाण, परमेश्वर डोके, सुभाष हुंबे, विनोद वाडकर सयाजी हुंबे, समाधान डोके, आप्पासाहेब देशमुख आदींसह केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news