Rajureshwar Temple Donation : राजुरेश्वराच्या चरणी 10 लाखांची देणगी

संकष्टी चतुर्थीला श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Rajureshwar Temple Donation
राजुरेश्वराच्या चरणी 10 लाखांची देणगीpudhari photo
Published on
Updated on

जालना ः भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथील श्री गणपती संस्थान राजूर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त गुरुवार, दि. 5 रोजी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मनोभावे दर्शन घेवून राजुरेश्वर चरणी सुमारे 10 लाख 18 हजार रुपयांची देणगी अर्पण केली.

दरम्यान, गुरूवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. हजारो भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन नवसपूर्ती केली. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती संस्थानकडे विविध माध्यमांतून एकूण 10 लाख 18 हजार 878 रुपये इतकी भरीव देणगी जमा झाली आहे.

Rajureshwar Temple Donation
Jalna Municipal Workers Protest : पाणीपुरवठा, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

संस्थान देणगी म्हणून 1 लाख 82 हजार 600 रुपये, अभिषेक देणगीतून 48 हजार 379 रुपये, बांधकाम देणगीतून 14 हजार 466 रुपये, सुबक मार्बल आसनासाठी 41 हजार 583 रुपये, तर पार्किंग शुल्कातून 16 हजार रुपये जमा झाले. या सर्व देणगीतून 3 लाख 3 हजार 28 रुपये संकलित झाले आहेत.

याशिवाय दानपेटीतून 4 लाख 38 हजार 320 रुपये, तर स्वतंत्र बांधकाम दानपेटीतून 2 लाख 77 हजार 530 रुपये मिळाले. दानपेटीमधून एकूण 7 लाख 15 हजार 850 रुपये जमा झाले. या सर्व रकमांचा मिळून एकूण जमा निधी 10 लाख 18 हजार 878 रुपये ) इतका झाला आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर परिसर, दर्शन रांगा, पार्किंग व्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस कर्मचारी व स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता दर्शन व्यवस्था यशस्वीरीत्या पार पडली.

Rajureshwar Temple Donation
Journalists Association Protest : किनवट स्थानकावरील रेल्वे सुविधांसाठी पत्रकार संघ आक्रमक!

श्री गणपती संस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, जमा झालेला निधी मंदिर विकास, भाविकांसाठी सुविधा, तसेच सुरू असलेल्या व प्रस्तावित बांधकाम कामांसाठी वापरण्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविकांनी दाखविलेल्या श्रद्धा व सहकार्याबद्दल संस्थानच्या विश्वस्तांनी सर्व भक्तांचे आभार मानले आहेत.

श्री गणपती संस्थान देणगी

श्री गणपती संस्थान देणगी 182600, अभिषेक देणगी 48379, बांधकाम देणगी 14466, सुबक मार्बल आसन देणगी 41583, पार्किंग 16000, टोटल 303028, दानपेटी 438320, बांधकाम दानपेटी 277530, टोटल 715850, टोटल : 303028, टोटल : 715850, एकूण 10,18,878 ( दहा लाख अठरा हजार आठशे आठ्यातर रुपये)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news